पुणे :
महसूल विभागाने ४० सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या असून अजून ५९ सेवा ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे.







सेवा पुरवण्यासाठी महा ई-सेवा केंद्रे महत्वाची असून सध्या १४३२ सेवा केंद्रे सुरू असून अजून आवश्यक ७८१ केंद्रांसाठी येत्या महिन्याभरात सर्व मंजुरी प्रक्रिया करुन सुरू करण्यात येतील, अशी घोषणा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत पुणे जिल्ह्यातील सर्व विभागांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. ते म्हणाले, “महसूल विभागाच्या विविध सेवा ऑनलाइन देण्यासाठी शहरासह जिल्ह्यात नवी ७८१ महा-ई-सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महिनाभरात सर्व मंजूरी प्रक्रिया पूर्ण करून ही केंद्रे नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील. ऑनलाइन ७/१२ व इतर अभिलेख डाऊनलोड करुन घेण्याचे मोठे प्रमाण आहे. जिल्ह्यात फेरफार अदालतींचे दर महिन्यात आयोजन करण्यात येते. १८ महिन्यांपूर्वी सहा लाख फेरफार मंजूर होते. त्यात विभागाने मोठे काम करुन आजअखेर १२ लाखाहून अधिक फेरफार मंजूर करण्यात आले आहेत.”








