महाळुंगे :
महाळुंगे येथील नाद गडांचा ग्रुपचा आनोखा उपक्रम गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील मानाच्या पाच गणपती चे दर्शन पायी चालत घेतले. यामध्ये प्रामुख्याने कसबा गणपती मंडळ तांबडी जोगेश्रवरी मंडळ व तुळशीबाग मंडळ व गुरुजी तालीम मंडळ मंडई गणपती मंडळ श्रीमंत दगडू शेठ गणपती व बाबु गेनू गणपती मंडळ या गणपतींचे दर्शन घेतले.
आपल्या अनोख्या उपक्रमांनी प्रसिद्ध असणारा “नाद गडांचा ग्रुप” विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम नेहमीच करत आहे. समाजाप्रती आपले काही देणे लागते या उदात्त हेतूने २०१६ पासुन ग्रुप सतत कार्यरत आहे. आपल्या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले यांना भेट देऊन तिथे विविध उपक्रम राबविणे. गड किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इतरही सामाजिक उपक्रमात हा ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो.
“नाद गडांचा ग्रुप” वतीने गड किल्ले स्वच्छता मोहीम, वेळोवेळी रक्तदान शिबिर, कोरोना काळात लसीकरण, गरजूंना मदत करणे असे विविध उपक्रम सतत राबविले जातात.
यावेळी अनोखा उपक्रम राबवत युवकांनी महाळुंगे ते श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिर पर्यत १६ किलोमीटर पायी चालत बाप्पाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पा चे आशिवार्द घेऊन सर्वाना सुखी ठेव अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना केली.
या मोहिमेस नाद गडांचा ग्रुप संस्थापक काळुराम गुलाब गायकवाड, अध्यक्ष संतोष बबन पाडाळे, सदस्य पृथ्वीराज मोहन कोळेकर, राजू कालिदास शेडगे, लोकेश धर्मराज पाडाळे, पंकज सुरेश पाडाळे, संतोष मारुती गोलांडे, राजवीर पाडुरंग पाडाळे, सहभाग घेतला होता. या पुढे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे असा संकल्प सर्व ग्रुपने केला आहे.