लक्ष्मीमाता मित्र मंडळाच्या वतीने स्व.शरदआप्पा महादू बालवडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथील लक्ष्मीमाता मित्र मंडळाच्या वतीने स्व.शरदआप्पा महादू बालवडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे व नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सलग अकराव्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले व ते यशस्वी झाले.

या शिबिरांची माहिती देताना आयोजक अक्षय बालवडकर यांनी सांगितले की, लक्ष्मीमाता मित्र मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सलग अकराव्या वर्षी यशस्वी रित्या रक्तदान शिबिर संपन्न झाले. तसेच यावर्षी परिसरातील नागरिकांनसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या दोन्हीं शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावर्षी रक्तदान शिबिरामध्ये १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करत मंडळाच्या या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.तसेच सुमारे ३६७ नागरिकांना अक्षय शरदआप्पा बालवडकर यांच्याकडून मोफत चष्मे वाटण्यात आले व ज्या नागरिकांना मोतीबिंदू चे निदान झाले आहे अशा नागरिकांवर मोफत शस्रकिया करण्यात येणार आहे

या शिबिरास सामाजिक, राजकिय, सांप्रदायिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तर लक्ष्मीमाता मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

See also  सुस रोड परिसरातील दुकानांना अचानक आग गॅरेज चालकाचे मोठे नुकसान..!