मुंबई :
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.







या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
थेट सरपंचपदासह 1166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान, 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांत 1 हजार 166 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होईल. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू
14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार
नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशपत्र मागे गेण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर त्याच दिवशी निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत या काळात मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल. तर नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी करण्यात येईल.








