बालेवाडी :
बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल बालवडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालेवाडी येथे बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे येथील महिलांसाठी खास “होम मिनिस्टर(खेळ रंगला पैठणीचा)” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा बक्षिस वितरण सोहळा संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला. परिसरातील महिलांनी या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला.







तसेच राहुल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील लहान मुलांकरिता बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांनी विविध खेळण्यांनचा आनंद घेतला. बाल मेळाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक गणपतराव बालवडकर, मा. सरपंच नामदेवराव बालवडकर, मा. सरपंच नामदेवराव बालवडकर, मा. सरपंच अंकुशराव बालवडकर, हभप संजय बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल बालवडकर यांनी वाढदिवसानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन महिलांचा सन्मान केला आहे. ते नेहमी या भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असतात. भविष्यात देखील चांगले काम करतील अशा अपेक्षा व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.
यावेळी मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे, पीडीसीसी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, सायली वांजळे, समीर चांदेरे, नितीन कळमकर, गणपत बालवडकर, गणपत मुरकुटे, अविनाश कांबळे, विशाल विधाते, मनोज बालवडकर, पुनम विधाते, सुषमा ताम्हाणे, राखी श्रीराव, मा. सरपंच नामदेवराव बालवडकर, मा. सरपंच अंकुशराव बालवडकर, हभप संजय बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे पारितोषिक विजेते
लकी ड्रॉ – मोफत दुबई ट्रीप
अर्चना अनिल धोंडगे
यावेळी उपस्थित ५० महिलांना लकी ड्रॉ द्वारे पैठणी भेट देण्यात आली.
होम मिनिस्टर कार्यक्रम बक्षीस
प्रथम क्रमांक(दुचाकी व पैठणी) – मिरा ज्ञानदेव जाधव
द्वितीय क्रमांक(टीव्ही व पैठणी) – बालिका सतीश काकडे
तृतीय क्रमांक(फ्रिज व पैठणी) – वर्षा अमृत गुंड
चतुर्थ क्रमांक(वॉशिंग मशीन व पैठणी) – संतोषी शशिकांत लोंढे








