स्पर्धेत भाग घेणे हेच मोठे बक्षीस असते : प्रा.डॉ. गजानन एकबोटे

0
slider_4552

शिवाजीनगर :

“विद्यार्थ्यांनो हे युग स्पर्धेचे असून बक्षिस मिळो अथवा न मिळो तरीही अनेक स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हा.स्पर्धेत सहभाग घेणे हेच सर्वात मोठे बक्षीस असते. म्हणून स्पर्धेत सहभागी व्हायचे असते” असे मत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल (मुलांचे) शिवाजीनगर येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात दादासाहेब एकबोटे आंतरशालीय संस्कृत पाठांतर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून पाचशेहून अधिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, उपकार्यवाह डॉ.निवेदिता एकबोटे, नियामक मंडळ सदस्य डॉ.नंदकिशोर एकबोटे,उपकार्यवाह व शाळा समिती अध्यक्ष चित्तरंजन कांबळे, प्रशालेचे निरीक्षक उद्धव खरे,नियामक मंडळ सदस्य प्रमोद शिंदे,सिनेट सदस्य दादाभाऊ शिनलकर,गणपत नांगरे, मुख्याध्यापिका शुभांगी घेवडे,उपमुख्याध्यापिका वंदना सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश लिंबेकर यांनी केले तर पर्यवेक्षक निवृत्ती गोपाळे यांनी आभार मानले.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्याल औंध येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन