औंध कुस्ती केन्द्रातील पै. अनिकेत मगर याने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत मिळविले सिल्व्हर मेडल..

0
slider_4552

औंध :

औंध कुस्ती केन्द्रातील पै. अनिकेत मगर याने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत सिल्व्हर मिळवित दैदीप्यमान कामगिरी केली. बावीस वर्षानी होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील टॉप आठ टिम यात सहभागी होत असतात.

पै.अनिकेत मगर हा सोलापूर जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व करत असून औंध कुस्ती केन्द्रात वस्ताद विकास रानवडे, अशोक गायकवाड, केदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली औंध कुस्ती केंद्रात सराव करतो आहे.

पै.अनिकेत मगर याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी ही निवड सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली आहे. ऊप महाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले यांचे पै.अनिकेत यास संपुर्ण सहकार्य असते.

See also  पी.ई. सोसायटी मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे 'द ग्रेट इंडियन बुक टूर : बुक टॉक - बुक फैर - वर्कशॉप' संपन्न