मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड वतीने निमगाव म्हाळुंगी येथे आर्थिक साक्षरता सप्ताह सुरु…

0
slider_4552

निमगाव म्हाळुंगी :

गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न महाविद्यालयातील फ्युचर्स बँकिग फोरम आर्थिक साक्षरतेच्या अभियानात गेली १५ वर्षापासून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना बँकिगची सवय लागावी तसेच महाविद्यालयातील युवा पिढीमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी यासाठी बँक मित्र या उपक्रमाद्वारे विविध उपक्रम घेत असते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे DEA फंड ठेवीदारांच्या साक्षरतेसाठी विविध संस्थाना आर्थिक साक्षरता केंद्र म्हणून मान्यता देते. माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंडला हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. RBI – DEF फंडने ग्रामीण, निमशहरी, व शहरी भांगामध्ये आर्थिक साक्षरतेचा उपक्रम घेण्यासाठी विविध सरकारी योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाला अनुदान दिले.

या नुसार पहिला कार्यक्रम निमगाव म्हाळुंगी शिरुर या गावात झाला. या प्रसंगी श्री निखिल गुलाक्षी( LDO, RBI) तसेच मा सरडे (LDO बँक आँफ महाराष्ट्र) मा सदानंद दिक्षित (एक्स CEO, पुणे पीपल्स को बँक) हे उपस्थित होते. ग्रामीण भागातील प्रामुख्याने शेतकरी, महिला,बचत गट,यांना या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालय व बँक आँफ महाराष्ट्र यांच्या पुढाकराने गावातील महिला कामीनी नागवडे यांना गावासाठी बिझनेस करसपाँडट म्हणून नियुक्त केले. बी सी कामासाठी लँपटाँपची गरज होती महाविद्यालयातील आनंद तोंडारे यांनी लँपटाॅप देऊन सहकार्य केले व गावात २५ एप्रिल ते ३० एप्रिल हा आर्थिक साक्षरता सप्ताह सुरु होण्यास मदत मिळाली.

या कार्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य मा बापू काळे यांची मदत झाली.
तसाच निमशहरी भागात दुसरा कार्यक्रम दि २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला. तो सासवड येथील ‘चिंतामणी हाँस्पिटल’ येथे घेण्यात हाँस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला. याप्रसंगी मा डाॅ संध्या खळदकर (संचालक चिंतामणी हाँस्पिटल) यांनी मनोगत व्यक्त केले. मा श्री श्रिकांत कारेगावकर, LDM, बँक आँफ महाराष्ट्र, अरुण बोनकर, मुख्य व्यवस्थापक, बँक आँफ महाराष्ट्र यांनी हाँस्पिटल स्टाफशी संपर्क साधला. हा उपक्रम आयोजित करण्यासाठी मा डाॅ. संध्या खळदकर व डाॅ. मंजुषा कुलकर्णी यांचे खुप सहकार्य मिळाले.

See also  लाच लुचपत विभागाची पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत धाड : भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना अटक

या कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देण्यात आली व योजनांची माहिती पत्रके वाटण्यात आली. सासवड येथील बँक आँफ महाराष्ट्र येथील किर्ती गुरव बँक मित्र (BC), यांनीही हाँस्पिटल स्टाफला बँकिंग सेवा आठवड्यातुन एकदा देण्याची विनंती मान्य केली. यापुढील शहरी भागातील आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम वारजे माळवाडी येथील बचत गटासाठी आयोजित केला आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय प्रा. विजया कुलकर्णी यांनी केले. यांत त्यांना डाॅ पल्लवी निखारे व अँडव्होकेट अदिती पिंपळे यांनी मदत केली. या कार्यक्रमाला प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह व डाॅ प्रकाश दिक्षित,उपकार्यवाह पी ई सोसयटी यांनी अभिनंदन केले.