नागपूर :
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० च्या घरात आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आज ३०० च्या घरात आपला दवाखानांचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याविषयी नागपुरातून बोलताना माहिती दिली. तसंच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा केलेल्या विस्ताराबाबत त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वात आणखी एक चांगली योजना सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. महात्मा फुले यांच्या जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंतचा इलाज मोफत केला आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत मिळत आहेत आणि आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत होत आहेत. यातून जवळपास ९०० ऑपरेशन्स आणि उपचार मोफत मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील १२ कोटींपैकी ८ कोटी लोकांना मोफत उपचार देणार आहोत.
तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांपेक्षा जास्त पैसे या योजनेतून देण्यात येतात. सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. आपलं दवाखानाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, “अतिशय उत्तम प्रकारची संकल्पना आहे ही. वेगवेगळ्या सेवा मोफत देण्यात येणार आहे. दवाखान्यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोफत देण्यात येणार आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होतोय, असं फडणवीस म्हणाले.