इर्शाळवाडी : दरडीने गिळलं गाव, अनेक लोक ढिगाऱ्याखाली

0
slider_4552

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गाव दरडीने गिळलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली संपूर्ण गावावर दरड कोसळली 70- 80 जण दबले;

रायगड :

मागील 2 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणी साचल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झलं आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा पावसाची रिपचिप सुरूच असूनया ठिकाणी खालापूर येथे एका गावावर काल रात्री दरड कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 70- 80 दबल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी एनडीआरएफ आणि अग्निशमनदलाच्या जवानांनी रेस्व्यू ऑपरेशन सुरू केलं आहे.

अपघातग्रस्तांच्या मदर्तीसाठी सामाजिक संस्था, एनडीआरएफ टीम, अग्नीशमन दल आदींकडून बचावकार्य वेगाने सुरु आहे. यासह रात्रीच स्पॉटवर गेलेले मंत्रीगिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत यांच्या नंतरआता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत आहेत. जोराचा पाऊस आणि धुके यामुळे बचावकार्य करण्यात अडथळा येत आहे. तसेच घटनास्थळ उंचावर आसल्याने येथे कोणतेही वाहन वगरे जात नसल्याने थेट मनुष्यबळासह बचावका्र्य करणे हा एकमेव पर्याय या ठिकाणी आहे.

See also  कोरोना संकटाचे भान राखून नवीन वर्षाचं स्वागत करावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे