ACP कडुन पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवले

0
slider_4552

पुणे  :

पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या पोलीस अधिकार्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या केली आहे. येव्हडच नव्हे तर या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे.

या घटनेनं एकच खळ्बळ उडाली आहे. भारत गायकवाड असं सदर पोलीस अधिका्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त आहेत.

पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात भारत गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर सुद्धा गोळी झाडून घेतली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकारांची माहिती चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.भारत गायकवाड आपल्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या करून नंतर स्वतःची आत्महत्या का केली? यामागे नेमकं काय कारण होते? है आद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

See also  योगीराज पतसंस्थेकडून संचालक आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्यांचा सत्कार.....