मुंबई :
दिनांक 23 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर आडोशी बोगद्याच्या मागे दरड कोसळली होती. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान दरड पडलेल्या भागातील सुटे झालेले दगड व माती काढण्याच्या कामासाठी सोमवारी दि.२४ रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वे ची मुंबई लेन बंद ठेवण्यात आली होती. परंतू आज (दिनांक 27) परत या दरडमधील डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी दुपारी १२ ते २ यावेळेत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
या दरम्यान कार वर्गीय वाहने जुन्या महामार्गावरुन शिंगोबा घाटातून खोपोली मार्गे सोडण्यात येणार असल्याची माहिती बोरघाट महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी दिली आहे.