पुणे :
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा उर्से टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळेस खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.







सुस्थितीत खड्डेमुक्त रस्ते, 24 तास मोफत रुग्णवाहिका, मोफत टोइंग सेवा, 100 मीटर जास्त रांग झाल्यास वाहने मोफत सोडणे. स्थानिक वाहनांना टोल मध्ये सवलत. फास्टटॅग स्कॅनिंग लवकरात लवकर व्हावे. न झाल्यास ती वाहने मोफत सोडण्यात यावे.
महिला पुरुषांना मोफत व स्वच्छ शौचालयाची व्यवस्था. वाहनांना मोफत वाहन तळ व्यवस्था करणे. महिलांसाठी प्रसूती गृहाची उभारणी करणे. प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करणे. कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी दाखला प्रशिक्षित कामगारांना प्राधान्य देणे. स्थानिक कामगारांना प्राधान्य देणे.
यावेळी सचिन चिखले शहराध्यक्ष, काकासाहेब डोळे, रूपेश म्हाळस्कर मावळ तालुका अध्यक्ष, सुशांत साळवी, अमर माळी, नितीन सूर्यवंशी, गोरक्ष मदने, पांडुरंग जगताप, अविनाश तरडे, कृष्ण महाजन, युवराज जाधव, रुपेश पटेकर सीमा बेलापूरकर, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरसे, सचिन शिंगाडे, कैलास दुर्गे, विनोद भंडारी, सुरेश सकट, नारायण पठारे विशाल साळुंखे, गणेश वाघमारे, मावळ तालुका पदाधिकारी सुरेश जाधव, तानाजी तोडकर, सतीश कारके, अनिल लालगुडे,अनंता तिकोने, भारत चिकणे, मच्छिंद्र मोहिते, सुरज भेगडे, सुरेश भिंगानिया संतोष म्हाळस्कर आदी उपस्थित होते.








