तलाठी भर्ती प्रक्रियेतील गोंधळाची मालिका सुरुच , मुंबईत उमेदवारांना  परीक्षा न देताच परतावे लागले ?

0
slider_4552

मुंबई  :

तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ सुरुच आहे. नाशिकमध्ये पेपरफुटीनंतर झालेल्या विदर्भातील परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. मुंबईत देखील ही परिस्थिती कायम आहे. मुंबईत तलाठी भरतीच्या परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. मुंबईतील पवई आयटी पार्क सेंटरवर आज विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले असता, वेळेपूर्वींच गेट बंद केल्यामुळे प्रवेश न मिळाल्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याना गेटवर उभं राहावं लागलं आहे.

परीक्षा केंद्रावर या विद्यार्थ्याची संवाद साधण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याना आल्या पावली परतावं लागणार आहे.२१ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात सर्वर डाऊन झाल्याची प्रकार समोर आला होता. यामुळे हजारो विद्यार्थ्याचा खोळंबा झाला होता. इंटरनेट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत थांबावे लागले होते. याबाबत प्रशासनाकडून सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याचे सांगण्यात आले होते.

See also  मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात श्र्वेतपत्रिका काढावी : चंद्रकांत पाटील