नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे नाराजी, अजित पवार गटाकडून आता मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक निघणार 

0
slider_4552

पुणे :

 

पक्ष संघटनेत मंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाकडून मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक काढण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. मंत्र्यांवर जबाबदारी देऊन महिना उलटला तरी नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे संबंधित मंत्र्ययाकडून कामकाजाचा अहवाल मागवण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.

मंत्र्यांना खात्याचा भार सांभाळतानाच जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात जाऊन कार्यकर्ता मेळावे घेणे, पक्षाच्या शिबिरांना हजेरी लावणे, पदाधिकन्यांच्या बैठका घेणे अशा जबाबदाच्या पार पाडाव्या लागणार आहेत.

कोणत्या मंत्र्यांवर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी?

अजित पवार – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर

छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर

दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर,बुलढाणा

सन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर

धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड, जालना

संजय बनसोडे – हिंगोली, लातूर, उस्मानाबाद

अदिती तटकरे – रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर

अनिल पाटील – जळगाव, धुळे, नंदुरबार

धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ

खासदार प्रफुल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, नागपूर

See also  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची नेमणुक.