महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  मराठी पाट्यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश

0
slider_4552

“मनसैनिकांचं लक्ष असेल हे विसरू नका”, राज ठाकरेंची व्यापाऱ्याना तंबी

मुंबई :

दहीहंडी, गणेशोत्स्व, दसरा, दिवाळी अशा सण-उत्सवाच्या काळातशहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनर्स आणि जाहिराती लागल्याचं चित्र दिसून येतं. हे बॅनर्स शहर विद्रूप करतात की नाही? यावर दोन्ही बाजूंनी मतं मांडली जात आहेत. पण त्याचवेळी या बॅनर्सच्याही पलीकडे दुकानांच्या नावांच्याच पाट्यांवरून गेल्या काही काळापासून वाद निर्माण झाला होता. या मुद्यावर मनसेनं खळळखट्याक् आंदोलनही केलं होतं.

अखेर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयानंही या व्यापाऱ्याना पाट्यांसंदर्भात निर्देश दिले आणि या प्रकरणार पडदा पडला. याचसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता एक सविस्तर पोस्ट करून आक्षेप घेणाच्या व्यापाऱ्याना तंबी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) ही पोस्ट केली आहे.

“ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यानी हा लढा न्यायालयात का गेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्टात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे”,असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हंटल आहे.

“महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी. हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पड़ू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेविल, कारवाई करेल ती करेिल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल है विसरू नका”, असा इशाराच राज ठाकरेंनी व्यापाऱ्याना दिला आहे.

https://x.com/RajThackeray/status/1706551750826553548?s=20

See also  16 आमदार अपात्र ठरले तरीही सरकारकडे बहुमत : अजित पवार