10 वी, 12 वी परीक्षेसाठी ‘17 नंबर अर्ज” भरण्याच्या तारखेत 7 दिवसांची मुदतवाढ

0
slider_4552

पुणे :

राज्यात 2024 मध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी भरण्यात येणारा 17 नंबर अर्ज अतिविलंब शुल्कासह 7 नोव्हेंबर भरता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केले आहे.

2024 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकडून नाव नोंदणीसाठी ऑनलाईन पद्दतीने 17 नंबर अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी दि. 15 ऑक्टोबर ते दि. 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिविलंब शुल्क भरून हा अर्ज स्वीकारण्यात येत होता.

या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठीचा कालावधी दि.1 नोव्हेंबर ते दि. 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

यासाठी प्रती विद्यार्थी, प्रतीदिन 20/- रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार असून हा अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे व संबंधित सूचना मंडळाच्या वेबसाईटवर मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. 10 वीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

See also  ब्रह्मगिरी वाचविण्यासाठी सहा राज्यांच्या वतीने एकत्रित पद्धतीने लढा देण्याचा निर्णय : राष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह