बारावी परीक्षेची परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ, 20 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार परीक्षा शुल्क

0
slider_4552

पुणे :

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या शुल्क भरण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही तारीख 6 नोव्हेंबर पर्यंत जाहीर करण्यात आली होती.

यामध्ये विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 7 ते 20 नोव्हेंबर अशी मुदत वाढ देण्यात आली आहे. तर विद्य़ार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन भरल्यानंतर शाळा व महाविद्यालयांना 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत बँकेत संबंधीत शुल्क आर.टी.जी.एस. मार्फत भरावे लागणार आहे.

यंदा बारावीसाठी 14 ते 15 लाख विद्यार्थी असतील, असा बोर्डाचा अंदाज आहे. परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजारांपर्यंत केंद्रे असणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेत त्वरीत परीक्षा शुल्क भरावे असे आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

See also  ब्रेकिंग न्यूज : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीमुळे नवजात बालकांचा मृत्यू . महाराष्ट्र हळहळला