मुंबई :
मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक बुधवारी (दि. 8) दुपारी दोन ते तीन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.







7/00 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. बुधवारी दुपारी 2 ते 2.30 या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 2.30 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
काम पुर्ण झाल्यावर दुपारी 2.30 वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 3 वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
See also शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : खासदार संभाजीराजे








