भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पीएमपीकडून ज्यादा बसेसचे नियोजन

0
slider_4552

पुणे :

एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव (पेरणे फाटा) येथे विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने ज्यादा बसेसचे नियोजन केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ ठिकाणावरून या बसेस सोडल्या जाणार आहेत.

पीएमपीएमएल प्रशासनाकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी या ज्यादा बसेस चालवल्या जाणार आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून 17 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तिथून पेरणे फाटा येथे जाण्यासाठी पीएमपी बसेस चालवल्या जाणार आहेत. वाहनांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही सोय केली आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाने आठ ठिकाणावरून ज्यादा बसेस चालवण्याचे नियोजन केले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुस्ती मैदान लोणीकंद, खंडोबा माळ लोणीकंद, सैनिकी शाळा फुलगाव तुळापुर रोड आणि चिंचवड हॉटेल वाय जंक्शन तुळापुर रोड येथून शहराच्या विविध भागात ज्यादा बसेस चालवल्या जातील. तर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीत पार्किंग वक्फ बोर्ड, जाधव पार्किंग चाकण रोड, तोरणा हॉटेल शिक्रापूर पार्किंग, वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल येथून ज्यादा बसेस सोडल्या जातील.

See also  पीएमपीएलच्या पास रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध ग्रामीण भागात तीव्र संताप.