सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज…

0
slider_4552

पुणे :

सरत्या वर्षाचा अखेरच्या दिवशी रविवार अर्थात सुटीचा वार आल्याने आनंद द्विगुणित झाला असून नववर्षाच्या स्वागताचे बेत तयार झाले आहेत. यासाठी फर्ग्युसन रस्ता, कॅम्प परिसर सज्ज झाले असून रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.

नव्या वर्षाला प्रारंभ होणार आहे. या वर्षाचे स्वागत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जागून करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलून जातात. या दिवशी रात्री अनेक रेस्टॉरंटमध्येही प्रचंड गर्दी दिसून येते. त्यामुळे अनेकांनी तेथे आगाऊ आरक्षण देखील केले आहे. दुसरीकडे अनेकांनी या सुटीचे निमित्त साधून पर्यटनस्थळी जाण्याचा पर्याय निवडला आहे.

नववर्षानिमित्त पोलिस बंदोबस्त

नागरिकांना नववर्षाचे स्वागत उत्साहात आणि सुरक्षितपणे यावे, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रस्त्यावर मध्यरात्री हुडदंग थांबवण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मुख्य चौकात आणि मुख्य रस्त्यांलगत पोलिसांचे पथक तैनात असतील.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. बिअर बार, पब आणि हॉटेल्सच्या परिसरात मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्टीनिमित्त बाहेर पडत असतात.

काही वाहनचालक मद्य पिऊन जोरात हॉर्न वाजवत भरधाव वाहने चालवतात. अपघात टाळण्यासाठी अशा मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, अमली पदार्थ तस्कर आणि त्याचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

See also  'हवामान बदलाच्या ' ग्लोबल ' दुष्परिणामांवर ' लोकल 'उपाय आवश्यक : जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह