सुहास दिवसे यांची पुण्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदी वर्णी

0
slider_4552

पुणे :

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची माळ सुहास दिवसे यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने त्यांची आज (दि.7) नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या जागी आता सुहास दिवसे जिल्हाधिकारी पदाची सूत्र सांभाळणार आहेत. सुहास दिवसे हे या आधी पुण्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त होते. सुहास दिवसे हे 2009 च्या बॅचचे आयएस् अधिकारी आहेत. त्यांनी पीएमआरडीए विकास आराखडा मार्गी लावण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. ते या आधी खेड प्रांताधिकारी होते.

See also  रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू दुचाकी आणि पादचाऱ्यांचेच; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना