बाणेर येथील आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या साई योगेश शिर्के याने ट्रम्पपोलीन जिम्नॅस्टिक स्पर्धेत पटकावली दोन सुवर्णपदके

0
slider_4552

बाणेर :

श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या साई योगेश शिर्के या विद्यार्थ्यास ट्रम्पपोलीन जिम्नॅस्टिक मध्ये राज्यस्तरीय दोन सुवर्णपदके मिळवण्यात यश मिळाले.

राज्यस्तरीय स्पर्धेनंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या देश पातळीवरील स्पर्धेमध्ये देखील साई शिर्के याला पुन्हा दोन सुवर्णपदके मिळाली आणि आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या या विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .

संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

See also  शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने योगा दिन उत्साहात पार.