मॉर्डन महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…

0
slider_4552

पुणे :

मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, समाजशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Career Opportunities in Sociology in Reference to NEP 2020 या एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रा डॉ. सलमा अझिज ,आबेदा इनामदार कॉलेज आणि प्रशांत आपटे ,समाजशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी मार्गदर्शन केले.

समाजशास्त्र विभागाने वनराई व वृद्धाश्रम आंबी येथे शैक्षणिक भेटी दिल्या,या भेटीच्या दरम्यान वनराई चे सचिव  अमित वाडेकर आणि जनसेवा फाउंडेशनचे प्रा. डॉ. लावणी आणि डॉ. विनोद शहा यांनी मार्गदर्शन केले.  124 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला .

या सर्व उपक्रमांचे संयोजन उपप्राचार्य आणि समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती गगनग्रास यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन आभार व आयोजन प्रा. पूजा यादव ,प्रा. प्रियांका हावले आणि प्रतिभा पवार आणि डॉ. मेघा देशपांडे यांनी केले.

See also  कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे सण उत्सव साधे पणाने साजरे करावे : अजित पवार