दौंड ते अजमेर साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी

0
slider_4552

पुणे :

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे झालेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दौंड ते अजमेर दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष दहा रेल्वे सोडल्या जाणार आहेत.

गाडी क्रमांक 09658 दौंड-अजमेर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष दिनांक 29 एप्रिल ते 1 जुलै या कालावधीत (10 फेऱ्या ) प्रति सोमवार दौंड येथून रात्री 11.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08.35 वाजता अजमेरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 09657 अजमेर-दौंड सुपरफास्ट साप्ताहिक विशेष दिनांक 28 एप्रिल ते 30 जून या कालावधीत (10 फेऱ्या) दर रविवारी अजमेरहून सायंकाळी 07.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.20 वाजता दौंडला पोहोचेल.

ही गाडी पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, चंदेरिया, भिलवाडा, विजयनगर आणि नसीराबाद येथे थांबेल.

See also  चीनची वाकडी नजर हिंदी महासागरावर !