मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांना बसणार चाप, प्रवाशाना व्हॉटसअप द्वारे करता येणार तक्रार

0
slider_4552

पुणे  :

रिक्षाच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी आता आरटीओ ने पाऊल उचलले असून आता व्हॉट्स ॲप द्वारे तक्रार करता येणार आहे.

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतले अथवा गैरवर्तन केले, अशा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण आता जलद होणार आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) यासाठी पाऊल उचलले आहे. प्रवासी 1 जूनपासून व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकणार आहेत. त्यावर आरटीओकडून तातडीने कारवाई केली जाणार आहे.हा क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे .

शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या तक्रारी प्रवासी नेहमी करतात. याचबरोबर अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात अथवा त्यासाठी भाड्यापेक्षा जास्त पैसे मागतात. अनेक जण मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, तक्रार करावयाची झाल्यास ती कशी करावयाची हा मूळ प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहतो. लेखी तक्रार देण्यासाठी आरटीओमध्ये जाण्यात त्यांना वेळ घालवावा लागतो.

नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकाचे छायाचित्र, चित्रफीत व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी पाठवू शकतात. त्यानंतर आरटीओतील अधिकारी संबंधित रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांची बाजू जाणून घेतील. ते पुरावे पडताळून रिक्षाचालकाने नियमभंग केला की नाही, याची तपासणी करतील. रिक्षाचालकाने नियमभंग केलेला आढळल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई केली जाईल.

See also  संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करून केली आमरण उपोषणाला सुरुवात