पुणे :
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाच्या भाविकांची संख्या मोठी असते. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे.







या गाड्या पुणे ते मिरजदरम्यान धावणार आहेत.पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान 12 अतिरिक्त अनारक्षित डेमू आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या पुणे-मिरज-पुणे अशा धावतील. विशेष गाडी 15 ते 20 जुलै या कालावधीत पुण्याहून दररोज सकाळी 8.30 वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी 4.15 वाजता मिरजला पोहोचेल. विशेष गाडी 15 ते 20 जुलै या कालावधीत मिरजहून दररोज दुपारी 4.45 वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पुण्यात पोहोचेल.
या विशेष गाडीला हडपसर, दौंड, जेऊर, कुवाडी, मोडलिंब,पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सालग्रे आणि आरग हे थांबे असणार आहेत. ही विशेष गाडी 10 डब्यांची असेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.








