पुणे :
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतः:च्या आर्थिक उत्पन्नातृून चांगल्या प्रकारचे पक्की घरे बांधणे शक्य होत नाही. शहरातील वाढत्या किमतीमुळे स्वतः:चे घर घेता येत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायाने झोपडपट्टीत राहावे लागते. ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती आणि नवबौदध लोकांचे राहणीमान उंचवावे आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रक्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून पात्रव्यक्तींनी रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31ऑक्टोबर ठरविण्यात आली आहे.







सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निकष आणि पात्रता नेमून दिलेले आहे.अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे
अ) घरपट्टी. पाणीपट्टी किंवा विद्युतबिल या कागदपत्रांपैकी एक
ब)सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
क)सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
अतिरिक्त दाखले
रेशनकार्ड,निवडणूक मतदार ओळखपत्र, महानगरपालिका मालमत्ता कर /झोपडपट्टी निर्मुलन आणि पुर्वसन विभागाकडील कर भरल्याची पावतीची प्रत
*पात्रता*
अ)महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातील असावा.
ब)महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्षाचे असावे.
क)शासनाच्या अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
द) अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा -मनपा क्षेत्राकरिता रक्कम 3 लाखपर्यत असेल,
इ)सदर योजनेचा लाभ पक्व्या घरावरील वरचा मजला बांधणेसाठी पात्र राहणार नाही.
अर्जदाराचे या अगोदर पक्के घर असेल तर अर्जदार पात्र ठरणार नाही.
बांधकाम करतेवेळी आवश्यक परवानगी संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि समक्ष अधिकारी तथा उपआयुक्त परिमंडळ पुणे महानगरपालिका यांचेकडून घेणे बंधनकारक.
रमाबाई आवास घरकुल योजना (शहर) करिता अर्ज https://www.pmc.gov.in/sites/default/files/ramai-awas-yojana-form.pdf या पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असून रमाबाई आवास घरकुल योजना (शहर) करिताचा अर्ज डाउनलोड करून रमाबाई आवास घरकुल योजना(शहर) करिता प्रमुख अटी आणि शर्ति आणि अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रांसह वरील पात्रतेत नमूद मान्य निकषानुसार पात्र असलेला आपला परिपूर्ण अर्ज आणि कागदपत्रे समाजकल्याण विभाग, टुसरा मजला,खोली क्रमांक-206, शिवाजीनगर, पुणे महानगरपालिका येथे दाखल करून पोहोच पावती ध्यावी.
क्षेत्रिय कार्यालयाकडून जागा पाहणीनंतर झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि विकास विभागावरील अभिप्रायानंतर अर्ज मंजुरीसाठी रमाई आवास घरकुल योजना समितीसमोर सादर केले जातील.
रमाई आवास योजनेसाठी अर्जदारांनी 31/10/ 2024 पर्यत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन उप आयुक्त, पुणे महानगरपालिका (समाजकल्याण विभाग) यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.








