राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जयेश मुरकुटे यांना माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडून धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी; बाणेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल.

0
slider_4552

बाणेर :

बेकायदेशीर रित्या खाजगी जागे मधून पाण्याची लाईन टाकण्यावरून पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची तक्रार जयेश मुरकुटे यांनी बाणेर पोलीस स्टेशन येथे केली आहे.

बाणेर येथील सर्वे नंबर 13/3 या मुरकुटे यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री जेसीबीच्या साहाय्याने खोदून पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरू होते. पुणे महानगरपालिकेने जागा मालकाला कोणतीही नोटीस न देता व संमती न घेता बेकायदेशीर प्रक्रिया करत काम सुरू केले होते. यावेळी जयेश मुरकुटे यांनी बेकायदेशीर काम थांबवले तसेच कायदेशीर रित्या विकास कामे करण्यात यावीत तसेच पाण्याची लाईन व रस्ते तयार करण्यात यावेत अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे व त्यांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी जयेश मुरकुटे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप जयेश मुरकुटे यांनी केला आहे.

जयेश मुरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9 मधून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जयेश मुरकुटे म्हणाले, धक्काबुक्की, धमक्या गुंडशाही असले प्रकारांना आम्ही भीक घालत नाही. प्रभागांमध्ये निवडणुका आल्या की भांडणे करण्याची जुनी परंपरा आहे. विकास कामांच्या नावाखाली सोसायटी व नागरिकांची दिशाभूल करायची व पालिकेला धरून बेकायदेशीर कामे करायची या गोष्टी आम्ही चालू देणार नाही. शिवीगाळ प्रकरणांमध्ये बाणेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

See also  पाषाण, औंध बाणेर, बालेवाडी, परीसरात विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद