बाणेर-बालेवाडीतील समस्यांवर नागरिक आक्रमक; १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा फेडरेशनचा इशारा…

0
slider_4552

बाणेर :

बाणेर-बालेवाडी परिसरातील प्रलंबित आणि गंभीर मूलभूत समस्यांवरून स्थानिक नागरिक आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन (BWF) आक्रमक भूमिकेत आले आहे. येत्या १५ दिवसांत महापालिका व लोकप्रतिनिधींनी ठोस कारवाईचा आराखडा सादर न केल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे.

फेडरेशन च्या मासिक बैठकीत झालेल्या निर्णयानुसार प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, नगरसेवक अमोल बालवडकर आणि नगरसेविका मयुरी कोकाटे यांना मागण्यांचे पत्र सुपूर्द करण्यात आले. तर नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनाही हे पत्र देण्यात येणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करूनही समस्या सुटलेल्या नसल्याने, आता थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) पत्रव्यवहार केला जात असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले.

बाणेर-बालेवाडीतील प्रमुख प्रलंबित समस्या:

* अपूर्ण रस्ते व फूटपाथ: अर्धवट राहिलेले रस्ते आणि ठिकठिकाणी तुटलेले फूटपाथ.

* वाहतूक कोंडी: वाढत्या वाहनांमुळे दैनंदिन प्रवासात होणारा मोठा अडथळा. तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते.

* रस्त्यावर कायम वाहनारे ड्रेनेजचे पाणी

* कचरा व्यवस्थापन: कचऱ्याची अस्ताव्यस्त स्थिती आणि दुर्गंधी.

* वीज प्रश्न: तासनतास विजेचा खोळंबा होत आहे. बाणेर-बालेवाडी सब-स्टेशनच्या कामातील अत्यंत मंद गती.

* ममता चौक उपद्रव: येथील वाईन्स शॉपमुळे स्थानिक नागरिकांना व महिलांना होणारा प्रचंड त्रास.

 

See also  समाजातील तळागाळातील खरे कोरोना योध्दा चा सन्मान "बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन" च्या वतीने