गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालय आणि भारतीय संस्कृती संरक्षण संस्थानातर्फे ‘क्विन्स मेरी इन्स्टिट्यूट’मध्ये रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

0
slider_4552

पुणे:

भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्विन्स मेरी इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स डिसेबल्ड सोल्जर्स’ (QMI) येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार यांनी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

कार्यक्रमात बोलताना कर्नल डॉ. वसंत बल्लेवार म्हणाले, “भाऊ-बहिणीचे हे नाते अत्यंत अतूट आहे. त्यामुळे सर्व फौजी या सणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार अधिक दृढ होतात.”

डॉ. नंदकुमार एकबोटे यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल सांगताना स्पष्ट केले की, “गेली १५ वर्षे आम्ही सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रम राबवत आहोत. राज्यातील सर्व भगिनींकडून प्राप्त झालेल्या राख्या एकत्र करून सीमेवर पाठवल्या जातात. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथे सैनिकांना ‘भाऊ’ म्हणून आदराने हाक मारली जाते आणि याच भावनेचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.”

या सोहळ्यात नायक सुभेदार हवालदार संदीपजी इंदलकर, नायक गुरुचरण सिंग आणि रायफलमॅन लोकेश यांनी आपले लष्करातील अनुभव सांगून उपस्थितांना प्रेरित केले. तसेच समृद्धी एकबोटे यांनीही आपल्या प्रातिनिधिक भावना व्यक्त केल्या.

  • सुत्रसंचलन व परिचय: कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजुषा कुलकर्णी, मधुसूदन शिंदे आणि विद्यार्थिनी श्रेया पवार यांनी केले. उपस्थितांना पाहुण्यांची ओळख विधी पांडव आणि रिमी सेन यांनी करून दिली.
  • प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला डॉ. दीपक शेंडकर, प्रा. कुमोद सपकाळ, डॉ. गोविंद कांबळे यांच्यासह एन.एस.एस. (NSS) आणि एन.सी.सी. (NCC) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • मार्गदर्शन: महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
See also  हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाचे ४१० कोटी मिळाले