तज्ज्ञांचे ज्ञान, वेळ आणि अनुभव समाजासाठी उपलब्ध करून देत गरजू व्यक्तींना शुद्ध, निष्पक्षपाती सल्ला, ज्ञान व संधी देण्याचा अभिनव उपक्रम…
पुणे :
ज्ञान आणि अनुभवाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘दान से उडान’ या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. विविध क्षेत्रांतील अनुभवी सल्लागार, व्यावसायिक, उद्योजक, तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांना समाजासाठी आपले ज्ञानदान करण्यासाठी एकत्र आणणारा हा उपक्रम आहे.






‘दान से उडान’ या उपक्रमांतर्गत सहभागी तज्ज्ञ आपल्या ज्ञान, वेळ, अनुभव आणि कौशल्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना कोणतेही मानधन दिले जाणार नाही. त्याऐवजी मार्गदर्शन घेणारी व्यक्ती संबंधित तज्ज्ञाने निवडलेल्या सामाजिक किंवा आध्यात्मिक संस्थेला अथवा सामाजिक कारणासाठी दान/योगदान करणार आहे.
यामुळे तज्ज्ञांचे ज्ञान केवळ व्यावसायिक किंवा वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता त्याचा सामाजिक कार्यासाठीही उपयोग होणार आहे. महिला, विद्यार्थी, युवक-युवती, शेतकरी, कामगार, गरजू व्यक्तींना करिअर, व्यवसाय, उद्योजकता, व्यवस्थापन, वित्त, तंत्रज्ञान, नेतृत्व, कौशल्य विकास आणि वैयक्तिक विकास* अशा विषयात सुयोग्य मार्गदर्शन करणारे विविध क्षेत्रांतील *४० तज्ज्ञ* या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.
‘दान से उडान’चे सह-संस्थापक रवी घाटे म्हणाले, “गरजवंतांना वेगवेगळ्या कन्सल्टन्सीच्या चक्रव्यूहात अडकवून त्यांच्याकडून हजारो रुपये घेऊन योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत नाही, त्यांची फसवणूक होते. यावर उपाय म्हणून विविध क्षेत्रातील प्रथितयश तज्ञांना “दान से उडान” च्या माध्यमातून एकत्रित करून त्यांच्याकडून गरजवंतांना शुद्ध, सात्विक, निष्पक्षपाती ज्ञान व सल्ला या उपक्रमाद्वारे दिला जाणार आहे. तज्ञ व्यक्ती ज्ञान दान, समय दान देतील तर गरजवंत तज्ञाने सुचवलेल्या सामाजिक उपक्रमास दान करेल.”
*आगामी काळात देशभरातील विविध क्षेत्रांतील प्रथितयश तज्ज्ञ आणि ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या गरजू व्यक्तींना या उपक्रमाशी जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.‘दान से उडान’
दान से ग्यान• ग्यान से उड़ान!अधिक माहितीसाठी भेट द्या :
www.DaanSeUdaan.com








