शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर.

0
slider_4552

मुंबई :

राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पाठोपाठ शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. पुढील आठवड्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन गृह विभागाने नियमावली तयार केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसे आवाहन करावे, असे गृह विभागाने नमूद केले आहे.

नियमावली

1 राज्यात शिवजयंती एकदम साध्या पध्दतीने करण्यात यावी.

2 येत्या 19 फेब्रवारीला किल्ल्यांवर जावून शिवजयंती साजरी करू नये.

3 सार्वजनिक ठिकाणी यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये.

4 प्रभात फेरी, मिरवणूकांचे आयोजन करु नये.

5 महाराजांच्या स्मारकास पुष्पाहार घालताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

6 आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे

See also  ओबीसी आरक्षणावरुन राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न