सांगवी प्रतिनिधी :-
दिनांक ०९/१२/२०२० रोजी सांगवी पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक यशवंतसाळुके व तपास पथकातील पोलीस अंमलदार असे सांगवी पोलीस ठाणे हददीत पेट्रोलींगकरीत असताना पोलीस अंमलदार अरुण नरळे यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत बातमीमिळाली की, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक पिंपळे गुरव पुणे येथे एक इसम पांढऱ्या रंगाचीकार घेवुन गुटखा विक्री करण्यासाठी येणार आहे.त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवीपोलीस ठाणे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके व तपास पथकातील अंमलदार असे रामकृष्ण मंगल कार्यालय चौकात सापळा लावुन
थांबले असता, दापोडी कडुन एक स्विफ्ट कार नंबर एम. एम.१२ एल.जे.६६५७ हि रामकृष्णमंगल कार्यालया चौकातील पान टपरी जवळ संशयीत रित्या थांबल्याची दिसली. स्विफ्टगाडीतील इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला. त्याने त्याचे नाव वपत्ता संजयचंद्र भोसडसिंग ठाकुर (वय ४५ वर्षे रा. ममता सोसायटी स.नं.३६,वडगाव शेरी(पुणे) असे असल्याचे सांगितले.
त्याचे गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असतास्विफ्ट कार मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यासाठी बंद असलेला एकुण २५,०००/- रुपयेकिंमतीचा तंबाखु जन्य गुटखा मिळाला. सदरचा गुटखा व ५०००००/- रुपये किमतीचीस्विफ्ट कार असा एकुण ५,२५,०००/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याचेकडे अधिक चौकशी करता सदरचा गुटखा हा पुणे शहर हद्दीतुन आणुन आयुक्तालयाच्या हद्दीतील लगतच्या भागात विक्री करीत असल्याचे त्याने सांगितले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ परिमंडळ २ आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग गणेश बिरादार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे रंगनाथ उंडे, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोहाडे, पोलीस शिपाई अरुण नरळे, विजय मोरे,प्रविण पाटील, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दिपक पिसे, शिमोन चांदेकर, यांनी केली आहे.