पुण्यात नविन रुग्ण संख्या घटली : खबरदारी घेतल्याचा फायदा

0
slider_4552

पुणे :

राज्यात कोरोना रूग्ण संख्येची चढ उतार होत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत, शहरात नवे रूग्ण आढळत आहेत. पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून रूग्ण संख्या वाढत होती. मात्र, गेल्या २४ तासांत अनेक दिवसांनी ३ आकडी नवे रूग्ण आढळले आहेत.

नवे रूग्ण आढळले ही बाब चिंताजनक आहेच पण इतके कमी आढळल्याने दिलासादायक बाब नक्कीच आहे. पुण्यात ६८४ नवे रूग्ण आढळले आहेत. तर, २७९० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे मुंबईत गेल्या २४ तासांत १२४० नवे रूग्ण आढळले आहेत. तर २५८७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत आणि ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मुंबई पुण्यातील रूग्ण संख्या कमी होताना दिसत आहे.

See also  पुण्यात आज केवळ पावणे अकरा पर्यंत हॉटेल पार्सल सेवेस परवानगी.