बाणेर :
बाणेर येथे पुणे मनपाच्या वतीने नव्याने विकसित होत, असलेल्या कोविड हॅास्पिटल ला प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देवुन हॅास्पिटलच्या कामाचा आढावा घेतला. नव्याने सुरू होणाऱ्या कोवीड रुग्णालयाची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर सुरू करण्याची आदेश यावेळी पाटील यांनी दिले.







सध्या सुरू असलेल्या बाणेर डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलच्या सेवेची माहिती घेऊन. या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत असल्याने. तेथील डॉक्टरांचा सन्मानही चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बाणेर येथे विविध डॉक्टरांशी संवाद साधून नविन उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसीस आजाराबाबत चर्चा केली. तसेच त्यांचा त्यांनी केलेल्या कामाबद्दल स्मृती चिन्ह देवून सन्मान केला.

या वेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सध्या कोठेच लस उपलब्ध नसल्याने लसीकरण संदर्भातला निर्णय हा महापालिकेच्या हातात नाही. केंद्र शासन राज्याला देणार व राज्य जिल्ह्यात वाटप करणार असे नियोजन आहे. त्यात लस कंपनीच्या करारानुसार 25% लस कमर्शिअल वापरासाठी, 25% एक्सपोर्ट साठी व 50 टक्के गव्हर्मेंट साठी असा करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार लसीचे वितरण सुरू आहे. खाजगी रुग्णालयांना लस सहाशे रुपयाला मिळत असल्याने ही लस नागरिकांना महाग मिळते. अनेक खाजगी रुग्णालयांना विनंती आहे आम्ही पैसे देतो तुम्ही गोरगरीब नागरिकांना फ्री मध्ये लस द्या अशा प्रकारचे नियोजन करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले की, रुग्णालयातून पुण्यातील गोरगरीब नागरिकांन साठी जवळपास एक लाख डोस खरेदी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी तर्फे केला जाणार आहे. यामध्ये रिक्षावाले, भाजीवाले व इतर कामगार वर्ग यांचा समावेश असेल. त्यांना कुपन पद्धतीने खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवून मोफत लस देण्यात येईल. असाच प्रयत्न शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इतर पक्षांनी ही लसीकरण पूर्ण करण्यासाठी करावे.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृह नेते गणेशजी बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने, आयुक्त विक्रम कुमार, अति.आयुक्त रुबल अगरवाल, शहर अभियंता प्रशांतजी वाघमारे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, शिक्षण मंडळ सभापती मंजुश्री खर्डेकर, कोथरुड अध्यक्ष पुनित जोशी, प्रकाश बालवडकर, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, लहु बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, संदीप खर्डेकर, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, स्वरुपा शिर्के, सुंदर बालवडकर, रोनक गोटे आदी उपस्थित होते.









