कोवीड काळात सेवा केल्याबद्दल डॉक्टर, पत्रकारांचा शिवसेनेच्या वतीने सन्मान : ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केले होते कार्यक्रमाचे आयोजन.

0
slider_4552

पाषाण :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त बाणेर येथे कोविड काळात उल्लेखनिय सेवा केल्याबद्दल डॉक्टर व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. बाणेर शिवसेनेच्या वतीने बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक, शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, डॉ.दिलीप मुरकुटे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, ॲड. दिलीप शेलार, ॲड. पांडुरंग थोरवे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, बाळासाहेब भांडे, ॲड. शिवाजी कदम, जीवन चाकणकर, राम गायकवाड, डॉक्टर राजेश देशपांडे, डॉक्टर सुपेकर ,डॉक्टर दिनेश लोखंडे, डॉक्टर धैर्यशील पाटील, नितीन चांदेरे, सरपंच मयुर भांडे, विशाल विधाते, आशुतोष आमले, सुनील कळमकर, श्याम बालवडकर, मकरंद कळमकर, संतोष भोसले आदी उपस्थित होते. पत्रकार केदार कदम, मोहसीन शेख, बाबासाहेब तारे, अभिराज भडकवाड, मॅक न्यूजचे संपादक अर्जुन पसाले आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास बाणेर परिसरातील सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, डॉक्टर, वकील उपस्थित होते.

डॉ. दिलीप मुरकुटे आपल्या प्रास्ताविक मध्ये म्हणाले की, कोरोना कालावधीमध्ये डॉक्टरांनी अनेकांना जीवदान दिले तर घर बसल्या वस्तुस्थितीची माहिती जीवावर उदार होऊन पत्रकार देखील देत होते. कोरोनाशी संघर्ष करत होते. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री देखील महाराष्ट्रातील प्रत्येक आपत्ती समोर संघर्ष करून सर्वसामान्यांच्या पर्यंत आधार व मदत पोहचवत आहेत.

लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर म्हणाले, या विधायक कामासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अशा गावांना व कुटुंबांना शासनाने जास्तीत जास्त मदत करा कार्य करावे त्यांचे नवीन जीवनमान वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. डॉक्टर व पत्रकार यांच्या प्रती राजकारण्यांची व सर्वसामान्यांची भावना ही सौहार्दपुर्ण असते ती अधिक वाढत जावी.

See also  शिवनगर येथील नवरात्री उत्सवाला सुरवात..

यावेळी पत्रकारांचा सन्मान लोकमत समूहाचे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीचा निषेध व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी दोन लिटर पेट्रोलच्या कुपन चे वाटप करण्यात आले.

ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, राज्यामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बाणेर गाव देखील एकत्र होऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेईल. राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना बाणेर परिसरातील नागरिक देखील आपला वाटा निश्‍चितपणे उचलतील.

यावेळी बोलताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, डॉ. दिलीप मुरकुटे नेहमीच सामाजिक कामासाठी पुढाकार घेतात. विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली. महा विकास आघाडीची बांधिलकी सर्वांना पाळावी लागेल तरच महापालिकेमध्ये महा विकास आघाडीची सत्ता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले की, संकटाचा कालावधी मध्ये मुख्यमंत्री सर्वांना मदत करत आहेत. आपलेसे वाटणारे मुख्यमंत्री लाभले आहेत. शिवसैनिक म्हणुन डॉ. दिलिप मुरकुटे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत नेहमीच सर्वांना सहकार्य केले आहे. चांगल्या पद्धतीचे पत्रकार निर्माण होवून पत्रकारांनी समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम करावे असे त्यांनी सांगितले.