slider_4552

मुंबई :

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते.

परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रम आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने पार पडण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी आदेशाचे काटेकोरपणाने पालन करणे. तसेच सदरची निवडणूक पार पाडताना covid-19 अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे आहे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या व त्याचे काटेकोरपणे पालन करावे.सदर निवडणुकीची पूर्ण खबरदारी जिल्हाधिकारी तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घ्यावयाची आहे.

See also  महाराष्ट्रात करोना वाढण्याची केंद्राच्या तज्ञ समितीने सांगितली कारणे.