नारायण राणे यांनी आता न्यायालयासमोर स्पष्टीकरण द्यावं : नाशिक पोलिस आयुक्त

0
slider_4552

नाशिक :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अडचणीत सापडलेले केंद्री मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरु झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.

प्रकरणाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. नारायण राणे यांनी आता न्यायालयासमोर त्यांनी जे विधान केलं आहे, त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, असं देखील पोलीस आयुक्त म्हणाले.

नारायण राणे यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं माहित नसल्याचं सांगत असे आदेश दिले गेले नाहीत, असं सांगितलं. यानंतर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असं स्पष्ट केलं. आम्ही जे आदेश दिले आहेत त्यात गुन्हा दाखल का करण्यात आला याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राणे यांच्याविरोधात कलम ५००, ५०५ (२), १३५-ब(१) (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं देखील पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

पोलीस आयुक्तांना संविधानिकरित्या अटकेची प्रक्रिया राबवण्यात आली का? असा सप्रश्न विचारण्यात आला. यावर पोलीस आयुक्तांनी उत्तर दिलं. “केंद्रीय मंत्री हे राज्यसभेचे सन्मानीत सभासद आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष जे आहेत उपराष्ट्रपती त्यांना अटकेनंतर माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे गुप्तचर विभाग, राज्य गुप्तचर विभाग तसंच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी, सर्वांना माहिती देण्यात येईल,” असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

“भारताच्या संविधानात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना गुन्हेगारी कायद्यातून मुभा आहे. यामध्ये प्रकरणाची वस्तुस्थिती पाहून निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही जे आदेश दिले आहेत त्यात गुन्हा दाखल का करण्यात आला याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राणे यांच्यावविरोधात कलम ५००, ५०५ (२), १३५-ब(१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेसाठी पथक रवाना करण्यात आलं असून अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.

See also  वैयक्तिक माहिती देवू नका : गृहमंत्री अनिल देशमुख