पुणे :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यामागे नवीन संकट उभारलं आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नितेश राणे आणि नीलम राणे यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे.
यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारने गृह विभागाला एक पत्र दिलं आहे. राज्याच्या गृह विभागाने ते पत्र पुणे पोलिसांना दिलं आहे. त्या पत्रानुसारच पुणे पोलिसांनी लूकआऊट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे. राणे यांच्या विरोधात एका संस्थेने तक्रार दिली होती, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
संबंधित तक्रार केंद्र सरकारकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांना प्राप्त झाली आहे. त्यानुसारच पुणे पोलिसांनी सर्क्युलर नोटीसची कारवाई झाली आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, हे प्रकरण राणेंच्या एका कंपनीच्या कर्जाबाबत आहे. नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणे यांच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटीचं कर्ज घेतलं आहे. त्यातील 25 कोटींच्या कर्जाची परतफेड झाली नाही. त्यानंतर डीएचएफएल कंपनीने पोलिसात तक्रार केल्यामुळेच राणेंवर क्राईम ब्रँचने लूकआऊट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे.