पुणे मेट्रो साठी इटली येथे तयार होणाऱ्या ट्रेनपैकी पहिली ट्रेन मुंबई बंदरावर दाखल

0
slider_4552

मुंबई :

पुणे मेट्रोसाठी 34 मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा (Titagarh Firema) या कंपनीला देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रेन मध्ये 3 कोच असणार आहेत. टिटागढ फिरेमा ही कंपनी 102 कोच पुणे मेट्रोसाठी बनवून देणार आहे.

त्यातील पहिल्या काही ट्रेन या टिटागढ फिरेमाच्या इटली येथील कारखान्यामध्ये तयार होणार आहेत. तर उर्वरित ट्रेन कोलकत्ता येथे तयार होणार आहेत. इटली येथे तयार होणाऱ्या ट्रेनपैकी पहिली ट्रेन (तीन कोच) आज (बुधवारी, दि. 6) मुंबई बंदरात दाखल झाली आहे. समुद्रमार्गे आलेली ट्रेन जहाजावरुन उतरवून ट्रक वर लादण्यात आल्या आहेत. कस्टम आणि इतर बाबींची पुर्तता केल्यानंतर ट्रेन लवकरच पुण्यात दाखल होणार आहेत.

पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या टिटागढ फिरेमा कंपनीच्या कोच या ऑल्युमिनियम धातूपासून बनविण्यात आल्या आहेत. त्या वजनाने हलक्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होणार आहे. तसेच त्यांना कमी देखभालीची गरज पडणार आहे. एका कोचची लांबी 29 मीटर असणार आहे. तसेच कोचची उंची 11.30 मीटर असणार आहे. कोचची अधिकतर रुंदी 2.9 मीटर असणार आहे.

एका कोचची प्रवासी आसनक्षमता 320 असणार आहे. आणि संपूर्ण 3 कोच ट्रेनमधून 970 प्रवासी प्रवास करू शकतील. प्रत्येक कोचमध्ये 44 लोकांना बसण्याची व्यवस्था असेल. कोचचा अधिकतम वेग 90 किलोमीटर प्रति तास असणार आहे. तीन कोचच्या ट्रेन मध्ये एक डब्बा महिलांसाठी राखीव असणार आहे.

त्याचप्रमाणे दिव्यांग जणांसाठी 2 व्हीलचेअर साठी राखीव जागा असणार आहे. या ट्रेनमध्ये जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. एअर कंडिशनिंग, सीसीटीव्ही, प्रवांशाच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजा, प्रवासी उद्घोषणा प्रणाली, दरवाजे उघडताना व बंद होताना दृश्य आणि श्राव्य संकेत प्रणाली असणार आहेत.

उर्वरित दोन ट्रेन बनविण्याचे काम इटलीतील टिटागढ फिरेमा कारखान्यात चालू असून लवकरच ते देखील भारतात पाठविण्यात येणार आहेत. ‘पुणे मेट्रोसाठी बनविण्यात आलेल्या ट्रेन या जागतिक दर्जाच्या, अत्याधुनिक, वजनाने हलके व ऊर्जेची बचत करणाऱ्या असणार आहेत, असे याप्रांसगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले आहे.

See also  महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज;  कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी...