मुंबई :
मराठीवरून मनसे अधिकच आक्रमक झाली आहे. मराठी नाही तर ॲमेझॉन नाही मनसेने पुण्याबरोबरच मुंबई देखील ॲमेझॉन कार्यालय फोडले आहे. मुंबईमधील चांदवड येथे दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली असुन मराठी च्या मुद्यावर मनसे आणि ॲमेझॉन मध्ये चांगली जुपलेली दिसते.







अमेझॉन ने मनसेच्या मराठी धोरणाविरुद्ध कोर्टात धाव घेतली असून त्यामुळे मनसे अधिकच आक्रमक झाली आहे. दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे विरुद्ध नोटीस बजावली असून राज ठाकरे आणि पाच सेक्रेटरी यांना कोर्टामध्ये 5 जानेवारीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
ह्या नोटिशी नंतर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. राज ठाकरे यांना नोटीस पाठवणाऱ्या ॲमेझॉन ला याची मोठी किंमत मोजावी लागेल त्यांना सह्याद्रीचे पाणी पाजणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळात ॲमेझॉन आणि मनसे यांचा मराठी भाषेवरून जोरदार संघर्ष होणार असे चित्र आहे.








