बावधन :
बावधन पाषाण सुतारवाडी परिसरात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त सूर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशन आणि झी टॉकीज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १९/१२/२०२१ ते बुधवार दि.२२/१२/२०२१ रोजी “मन मंदिरा” गजर भक्तीचा भव्य कीर्तन महोत्सव आणि श्री साई सत् चरित्र कथा असा दुग्धशर्करा योग परिसरातील भाविकांसाठी अनुभवयास मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे झी टॉकीज वरील किर्तन मालिकेत प्रक्षेपण होणार आहे.







कार्यक्रमाची माहिती देताना युवा नेते सूर्यकांत भुंडे यांनी सांगितले की, आपल्या परिसरात बहुसंख्य नागरिकांना सांप्रदायिक क्षेत्रामध्ये फार आवड आहे. म्हणूनच सर्वच नागरिकांसाठी हा भक्तीचा ठेवा “मन मंदिरा” गजर भक्तीचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम समस्त नागरिकांना याची देही याची डोळा अनुभवता यावा अशी अपेक्षा आहे. म्हणूनच सर्व नागरिकांना आव्हान आहे की या भव्य दिव्य कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.
कार्यक्रमाची रूपरेषा :
भव्य कीर्तन महोत्सव व श्री साई सत् चरित्र कथा
रविवार दि. १९ डिसेंबर २०२१ ते बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी
ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे
(आळंदी देवाची)
रविवार दि. १९ डिसेंबर २०२१
दुपारी ३ ते ५ पर्यंत
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
(जळगांव)
रविवार दि. १९ डिसेंबर २०२१
सायं. ७ ते ९ पर्यंत
ह.भ.प.कल्याण महाराज काळे-पाटील
(शेवगांव, नगर)
सोमवार दि. २० डिसेंबर २०२१
दुपारी ३ ते ५ पर्यंत
ह.भ.प.सागर महाराज बोराटे
(नातेपुते, सोलापुर)
सोमवार दि.
डिसेंबर २०२१
सायं. ७ ते ९ पर्यंत
महंत
ह.भ.प.नवनाथ महाराज माशेरे
(रांजणगांव, शिरुर)
मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१
दुपारी ३ ते ५ पर्यंत
ह.भ.प.संग्रामबापु भंडारे पाटील
(आळंदी देवाची)
मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१
सायं. ७ ते ९ पर्यंत
ह.भ.प.पुरुषोत्तमदादा महाराज पाटील
(आळंदी देवाची)
बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१
सायं. ७ ते ९ पर्यंत
श्री साई सत्चरित्र कथा
ह.भ.प.नवनाथ महाराज म्हस्के
(बाभळेश्वर, शिर्डी)
रविवार दि. १९ ते २२ डिसेंबर २०२१
सकाळी १० ते १ पर्यंत
॥मन मंदिरा॥
गजर भक्तीचा
झी टॉकीज वरील लोकप्रिय कीर्तन मालिकेत प्रेक्षपण
स्थळ : सर्व्हे नं. २०, उत्सव होम समोर, चेलाराम
हॉस्पीटल जवळ, पाटीलनगर, बावधन बु।।, पुणे.
संयोजक
सौ.सुजाता सुर्यकांत मुंडे
श्री.सुर्यकांत पांडुरंग मुंडे
सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशन
सदस्य, ग्रामपंचायत बावधन









