सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी गावांमध्ये परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रथम भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. युवा नेते सचिन दळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रराज्य प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत, डिजिटल हेल्थ कार्ड, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत यावेळी देण्यात आली.
यावेळी आपल्या प्रास्ताविक मध्ये युवा नेते सचिन दळवी म्हणाले की, परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रथमच सोमेश्वर वाडी गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत सुरू झालेल्या असंख्य योजना परिसरातील नागरिकांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यकाळात देखील गरजवंतांना विविध मार्गे मदत करण्याचं काम मी आणि माझा मित्र परिवार केरेल.
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सचिन दळवी हे तरुण तडफदार नेतृत्व असून नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदत करण्याचे काम सतत करत आहे. आज पर्यंत विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत असतात. खूप कमी वेळामध्ये खूप चांगले काम सचिन दळवी यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे नागरिकांना संपर्क करण्याचे एक चांगले माध्यम उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून नागरिकांची विविध कामे मार्गी लागावी तसेच विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्न व्हावे.
यावेळी कोथरूड विभाग अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा सहकार आघाडीचे प्रकाश बालवडकर, युवा नेते लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, शिवम सुतार, राहूल कोकाटे, मंदार घुले, विनायक काकडे आणि मिञ परीवार उपस्थित होते. यावेळी सोमेश्वरवाडी ग्रामस्थांच्या वतीने पोपटराव जाधव, खंडू शेठ आरगडे, चिंतामण दळवी, श्यामराव काकडे, बारीकराव जोरे, उत्तमराव जाधव, काळूराम काकडे, रोहिदास घोलप, यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला.