सूर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी…

0
slider_4552

बावधन :

बावधन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तसेच सुर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत भुंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुर्यकांत भुंडे म्हणाले की, आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वांच्याच मनामध्ये एक वेगळे स्थान आहे. अशा आदर्शवत व्यक्तिमत्वाला आज त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करत आहे. आपल्या आचार विचारांनी नेहमीच सर्वांचीच मने जिंकली. त्यांच्या विचारांनी आजही ते सर्वांना प्रेरित करतात. अशा वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे, पांडुरंग दगडे, विशाल दगडे, आशिष दगडे, किरण भुंडे, शंकर इंगवले, सुजित भुंडे, सतीश भुंडे, विश्वास दगडे, सुनील भुंडे, मयूर भोते, प्रवीण भुंडे, महेश दगडे, ज्ञानेश्वर साठे, अशोक दगडे आदी उपस्थित होते.

See also  प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी अग्रस्थानी असते महिला : चित्रा वाघ