कोथरुड :
किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन च्या त्रैवार्षिक निवडणूकीमधे अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली जय गणेश पॅनल सलग पाचव्यांदा भरघोस मतांनी विजयी झाले.







जय गणेश पॅनल वर असलेला विश्वास सर्व कामगारांनी बंद मतपेटीतून पॅनल टू पॅनल मतदान करून एकी हेच बळ सलग पाचव्यांदा सिद्ध केले. युनियनचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सलग पाच वेळा निवडून येणारा हा कमिन्स कंपनीमधील ऐतिहासिक निकाल आहे. कामगारांच्या हक्कासाठी लढणारे व आपल्या कामाने सर्वांच्या मनात असणारे पॅनल कामगारांनी निवडून दिला.
पॅनल चे अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांनी कामगारांची केलेली बांधणी व सर्वांना एकत्र बांधून संघटन हिच शक्ती आहे हे त्यांनी या यावरून दाखवून दिले आहे. आपल्या हक्काचा पॅनल निवडून आल्याने कामगार आनंदी आहेत.
See also गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढें नेला : प्रकाश जावडेकर








