हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! ढग फुटीमुळे ७ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

0
slider_4552

हिमाचल :

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल
प्रदेशात पुन्हा एकदा ढगफु्टीने हाहाकार उडाला आहे. राज्यातील सोलन येथील धायवाला गावात ढगफुटी झाली. सोलनचे डीसी मनमोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जणाना वाचवण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी ढगपफुटीच्याही घटना समोर आल्या आहेत. सोलनधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढग फुटुन किमान सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक
जण जखमी झाले. ढगफुटीमुळे दोन घरे आणि एक गोठा वाहून गेला. तसेच, सोलनमधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढगफुटीच्या घटनेनंतर पाच जणांना वाचवण्यात आले, असे एसडीएम कंदाघाट, सिद्धार्थ आचार्य
यांनी सांगितले.

कमल किशोर ( ३५), हेमलता ( ३४), राहुल
(१४), नेहा (१२), गोलू (८), रक्षा (१२) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. या दुर्घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सोलनच्या जदोन गावात ढगफुटीमुळे सात जणांच्या मृत्यूबद्दल शोक
व्यक्त केला आहे. “या कठीण काळात पीडित कुटुंबाना सर्व शक्य मदत आणि समर्थन सुनिश्चित करण्याचे निर्देश आम्ही अधिकाऱ्याना दिले आहेत,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

See also  देशातील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला केंद्रिय मंत्रिमंडळात मंजुरी