माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गरीब नागरिकांच्या सेवार्थ संजय गांधी(पेंशन) अंतर्गत शासकीय अनुदान मिळण्यासाठी विशेष शिबीर.

0
slider_4552

औंध :

कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ सिद्धार्थजी शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) अंतर्गत रू. १२०० दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे.

या अभियानाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, सार्वजनिक आयुष्यात काम करत असताना रोजच्या धकाधकीच्या जीवनात दीनदुबळ्यांची कष्ट कमी करण्यासाठी कार्य केले पाहिजे, ही कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांची शिकवण आहे. जनसामान्यांचे कष्ट कमी होऊन शासनाच्या उपाययोजनेचा त्यांना लाभ व्हावा यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून नागरिकांचे कार्य सुलभ कसे होईल यासाठी आम्ही सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम व अभियान राबवित आलो आहे आणि भविष्यातही राबवित राहू.

याच दृष्टिकोनातून कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ विशेष शिबिर औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे. याचा आपण विशेष लाभ घ्यावा व शिबिरास भरभरून प्रतिसाद द्यावा, ही नम्र विनंती माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केली.

या शिबिरात नाव नोंदणी दिनांक ७/८/२०२२ ते ८/८/२०२२ पर्यंत कै. खंडेराय जुनवणे शाळा कस्तुरबा वसाहत औंध येथे स्वीकारली जाणार आहे.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न