माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
slider_4552

शिवाजीनगर :

कार्यसम्राट मा.आमदार विनायक निम्हण साहेब यांच्या वाढदिवसानिमित शिवाजीनगर मतदार संघातील सात ठिकाणी जनते साठी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते दिनांक ०७/०८/२०२२ रोजी कै.खंडेराव जुनवणे शाळा, इंदिरा वसाहत येथे पार पडले

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे शिवाजी नगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले आरोग्य शिबिर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे यशस्वी झाल्याचा निश्चित आनंद व समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी यावेळी दिली. या शिबिराचा ४७८ लोकांनी लाभ घेतला व १७२ लोकांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटण्यात आले. खऱ्या अर्थाने सामजिक सेवेतून आबांचा वाढदिवस साजरा झाला याचा आनंद सनी निम्हण यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास अविनाश कांबळे, रमेश जुनवणे, वनमाला कांबळे, अनिकेत कपोते, सुभद्रा कुंभार, शारदा फुलवळे, बापु मलठनकर अदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद कांबळे, संजय तारडे, अजय नागटिळक, गणेश धस, आकाश जुनवणे, सुनील अवघडे, शिवाजी साळुंखे, रेखा वाघमारे यांनी केले.

See also  माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गरीब नागरिकांच्या सेवार्थ संजय गांधी(पेंशन) अंतर्गत शासकीय अनुदान मिळण्यासाठी विशेष शिबीर.