बावधन येथे भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा.

0
slider_4552

बावधन :

आपल्या गौरवशाली भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व अर्पण करणा-या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना नमन करण्यासाठी व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी बावधन येथे ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले होते.

यावेळी बावधन चे उपसरपंच दीपक दगडे पाटील यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांसोबत भारतभूमीचा अमृतमहोत्सव सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी उर भरून आला. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या मातृभिमीच्या प्रेमाचे बाळकडू लहानपणापासूनच असते, त्यात शालेय जीवनात अधिक वाढ होत असते. आज हा सोहळा साजरा करताना विद्यार्थ्यांमधील अनेक सुप्त कलागुण दिसून आले. स्वातंत्र्य दिनाचा आनंद उत्सव दोन वाहताना पाहत असताना मनाला एक वेगळे समाधान मिळाले.

यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा असेल, तलाठी ऑफिस, शिवसेना ऑफिस, शहीद राजगुरू चौक, चेतन दत्ताजी गायकवाड माध्यमिक विद्यालय, कोथरूड बावधन उप क्षेत्रीय कार्यालय बावधन बुद्रुक, ग्रामपंचायत ऑफिस येथे ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर व अधिकारी वर्गाने या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रत्येक ठिकाणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मन उत्साहित होते. राष्ट्रकार्यात प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले

या सोहळ्यास पोलीस पाटील बबनराव दगडे, सरपंच पीयूषा दगडे, उपसरपंच दीपक दगडे, मा उपसरपंच वनराज दगडे, मा उपसरपंच रेश्मा खिलारे ,सामाजिक कार्यकर्त्यां वंदना दगडे, विशाल खिलारे,आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर ,शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

See also  प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा वापर करावा : चंद्रकांत पाटील